Tuesday, March 25, 2025
Homeनगरपेट्रोल पंपावर डिझेल भरून बाहेर पडताच कारने घेतला पेट

पेट्रोल पंपावर डिझेल भरून बाहेर पडताच कारने घेतला पेट

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी फॅक्टरी परिसरातील नगर-मनमाड महामार्गालगत (Nagar Manmad Highway) असलेल्या एका पेट्रोल पंपा जवळ एका चारचाकी गाडीने अचानक पेट (Car Fire) घेतल्याने एकच धांदल उडाली. ही घटना शुक्रवार दि. 3 जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील एका पेट्रोल पंपावरून शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी डिझेल (Diesel) टाकून बाहेर पडली असता तीने अचानक पेट घेतला.

- Advertisement -

गाडीला आग लागल्याने एक धांदल उडून पळापळ सुरू झाली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करून देवळाली प्रवरा नगरपालिकेचय (Deolali Pravara Municipal) आग्निशामक बंबाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. गाडीतील बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे या गाडीने पेट घेतल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. सुदैवाने या चारचाकी गाडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर पडल्याने पेट घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...