Friday, September 20, 2024
Homeनगरनगर- मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल

नगर- मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल

8 ते 17 सप्टेंबरपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर- मनमाड रस्त्यावरील विळद बायपास ते पुणतांबा फाटा पर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत शनिवारी (7 सप्टेंबर) आदेश काढले आहेत. 8 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी देखील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आले आहेत.

नगर- मनमाड या महामार्गाचे दुरूस्तीच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नगर/पुणे/सोलापूरकडून मनमाडकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरिता कल्याण बायपास चौक, नगर- कल्याण महामार्गावरून आळेफाटा, संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट, दूध डेअरी चौक, शेंडी बायपास, नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून कायगाव, गंगापूर, वैजापूर- येवला मार्गे इच्छित स्थळी जातील. शनिशिंगणापूर/सोनई रस्त्यावरून मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून इच्छित स्थळी जातील.

तसेच मनमाड, येवला, शिर्डीकडून नगर मार्गे पुणे/मुंबई कल्याणकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरिता मार्ग पुणतांबा फाटा, झगडे फाटा, सिन्नर- नांदूर शिंगोटे – संगमनेर, आळेफाटा मार्गे असेल. मनमाड- येवलाकडून नगर/सोलापूर/बीडकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरिता मार्ग- पुणतांबा फाटा येथून वैजापूर, गंगापूर कायगाव, प्रवरासंगम, शेंडी बायपास, विळद घाट केडगाव बायपास मार्गे असेल. लोणी/बाभळेश्वर/श्रीरामपूरकडून नगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर- श्रीरामपूर- टाकळीभान-नेवासा मार्गे- नगर अशी असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या