कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar Manmad Highway) पुणतांबा फाटा येथे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कंटेनरखाली चिरडून पादचारी महिलेचा मृत्यू (Container Hit Woman Death) झाला. शनिवारी दुपारी वैजापूरवरून झगडे फाट्याच्या दिशेने कंटेनर (MH 43 CE 8693) जात होता. हा कंटेनर पुणतांबा फाट्याजवळ (Puntamba Phata) असताना रुक्साना हसन बागवान (वय 69, रा. दत्तनगर, कोपरगाव) ही पादचारी महिला रस्ता ओलांडत होती.
कंटेनरने रुक्साना बागवान यांना चिरडले. महिलेचा टायरखाली सापडून मृत्यू झाला. कोपरगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि सदर महिलेचा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यांना वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.
दरम्यान कंटेनर चालक नशेत असल्याचे म्हणत स्थानिक नागरिकांनी त्याला चोप दिला व नंतर पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.