Thursday, July 23, 2026
Homeनगरनगर-मनमाड महामार्गावर कंटेनर बसचा भीषण अपघात

नगर-मनमाड महामार्गावर कंटेनर बसचा भीषण अपघात

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) कोपरगाव येथील कातकडे पेट्रोल पंपा नजीक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनरचा रविवारी भीषण अपघात (ST Bus and Container Accident) झाला. या अपघातात बस चालकासह आठ जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. अपघातातील जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले असून एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस शिर्डीकडून (Shirdi) छत्रपती संभाजी नगरकडे (Chhatrapati Sambhaji Nagar) रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून जात असताना कोपरगाव शहर हद्दीतील नगर मनमाड महामार्गावर बेट नाका परिसरात कातकडे पेट्रोल पंपा समोर कंटेनरला मागून जोराची धडक दिली.

- Advertisement -

यात बस चालकासह आशा विलास गायकवाड, आरती पठारे, कांताबाई डेंगळे, शांताबाई डेंगळे, आशा राजपूत, सुजाता सचिन लूनावत, सहारे कल्याण, सुनीता सचिन लूनावत असे आठ प्रवासी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघात (Accident) होताच कंटेनर चालक फरार झाला असून सदर अपघात हा ओव्हर टेकच्या नादात झाला असल्याचे समजते. याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस (Kopargav City Police) करीत आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...