Saturday, May 4, 2024
Homeनगरबारा फुटी अजगर निसर्गात मुक्त

बारा फुटी अजगर निसर्गात मुक्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील एमआयडीसी येथील एका कंपनीत बिळात जाऊन बसलेला 12 फुटी अजगर (इंडियन रॉक पायथन) रात्री आढळून आला.

- Advertisement -

सर्पमित्र युसूफ बशीर खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मध्यरात्री कंपनीत जाऊन मोठ्या कौशल्याने हा अजगर पकडला.

रात्री घुशीची शिकार केल्याने तो सुस्त बसला होता. हा अजगर पकडल्यानंतर तो 12 फुटी व 15 ते 20 किलो वजनाचा असल्याचे निदर्शनास आले. भलामोठा अजगर पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली. तर शेवटी अजगर पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुसर्‍या दिवशी खान यांनी वनाधिकारी थिटे व शर्मिले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त केला.

यावेळी अली खान हा देखील उपस्थित होता. यावर्षी अजगर, घोणस व मन्यार सर्प जातींमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, असे आवाहन खान यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या