Thursday, September 12, 2024
Homeनगरनगर : जिल्ह्यात आजपर्यंत ४१ हजारांच्यावर रुग्ण करोनामुक्त

नगर : जिल्ह्यात आजपर्यंत ४१ हजारांच्यावर रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२३७ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०४, नगर ग्रामीण ०१, राहाता ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १७०, अकोले ३३, जामखेड २९, कर्जत २२, कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ८०, नेवासा ४९, पारनेर ३३, पाथर्डी ४१, राहाता ४४, राहुरी २४, संगमनेर ६३, शेवगाव ४०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या