Friday, April 25, 2025
HomeनगरAccident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

Accident News : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

नगर-पुणे महामार्गावर घडली घटना

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-पुणे महामार्गावर (Nagar Pune Highway) सुपा (ता. पारनेर) येथील चौकात नगरहून पुण्याकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Unknown Vehicle and Bike Accident) दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

रविवारी (दि.2) पहाटे 2.36 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात (Accident) झाला. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा शोध सुरु केला आहे. या अपघातात (Accident) रावसाहेब लक्ष्मण कडूस (वय 80) व साहेबराव रखमाजी कडूस (वय 64, दोघे रा. सारोळा कासार, ता. नगर) हे जागीच ठार झाले आहेत तर संजय बाबुराव खोसे (वय 60, रा. अस्तगाव ता. पारनेर) हे गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांना उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मयत व जखमी हे 1 मार्चला सायंकाळी पारनेर (Parner) तालुक्यातील पिंपळनेर येथे यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेले होते. 2 मार्चला पहाटे ते गावाकडे परतत असताना पहाटे 2.36 वाजण्याच्या सुमारास सुपा येथील चौकात ते आले. या चौकातून वाळवणेच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना नगरकडून पुण्याच्या (Pune) दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक (Hit) दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहन पसार झाले. ही घटना चौकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुपा पोलिस ठाण्यात (Supa Police Station) या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट या करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...