Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर शहर शिवसेनेच्या बैठकीत दोन नेते एकमेकांना भिडले

नगर शहर शिवसेनेच्या बैठकीत दोन नेते एकमेकांना भिडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर शिवसेनेत असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पक्षाची सभासद नोंदणी मोहिम सुरू आहे.

- Advertisement -

यासंदर्भात सावेडी येथे सुरू असलेल्या पक्षाच्या बैठकीत उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे व युवा सेनेचे पदाधिकारी रवींद्र वाकळे यांच्यामध्ये वाद उफळून आला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लहामगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शिवसेना पक्षाची सभासद नोंदणी अभियानाबाबत बैठक सुरू असताना वाकळे यांचे भाषण झाले. त्यानंतर लहामगे यांनी आपल्या भाषणात वाकळे यांच्या भाषणाबाबतच्या वाक्याशी मी सहमत आहे. त्यांनी उत्कृष्ट भाषण केले आहे. असे म्हणाल्याचा वाकळे यांना राग आला. त्यामुळे वाकळे यांनी शिवीगाळ करून, जातीवाचक भाषा वापरली.

तुम्ही आमच्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हाला एका एकाला जिवंत सोडणार नाही, मारून टाकू. असे म्हणून वाकळे निघून गेले. वाकळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शिवसेना पक्षाची बैठक सुरू असताना मी भाषण करीत होतो. त्यावेळी लहामगे हे भाषणामध्ये सारखे अडथळा निर्माण करीत होते.

त्यावेळी मी त्यांना समजावून सांगितले. माझे भाषण संपल्यानंतर लहामगे यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘वाकळे यांनी भाषण केले असून, मी आता काय बोलायचे’, यावेळी मी त्यांना म्हणालो की, ‘तुम्ही माझे नाव घेऊन बोलू नका’. माझ्या बोलण्याचा लहामगे यांना राग आल्याने त्यांनी मला शिवागाळ केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या