Friday, April 25, 2025
Homeनगरवाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

नगर- सोलापूर महामार्गावरील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर – सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात मंगळवारी (26 नोव्हेंबर) रात्री घडली. ऋत्विक बाळासाहेब लोखंडे (वय 23, रा. संजयनगर, काटवन खंडोबा) असे मयत युवकाचे नाव आहे. तो शहरातील काटवन खंडोबा परिसरात स्नेहालयच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या संजयनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा समन्वयक म्हणून काम पाहत होता.

- Advertisement -

ऋत्विक लोखंडे हा रूईछत्तीसी (ता. नगर) येथे मित्राच्या घरी गेला होता. तेथून नगर- सोलापूर महामार्गाने दुचाकीवर नगरकडे परतत असताना साकत (ता. नगर) गावच्या शिवारात त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला रुग्णवाहिकेव्दारे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. बुधवारी (27 नोव्हेंबर) अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोपट अंबादास घाडगे (वय 46 रा. संजयनगर, काटवन खंडोबा) यांनी फिर्याद दिली आहे. मयत ऋत्विक लोखंडे हा स्नेहालय प्रकल्पात गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत होता. त्याच्याच देखरेखीखाली काटवन खंडोबा परिसरात संजयनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू होते. त्याच्या अपघाती निधनाने स्नेहालय प्रकल्पाचा एक मोठा कणा हरपला असल्याचे गिरीश कुलकर्णी व हनीफ शेख यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...