Friday, May 31, 2024
Homeनगरनगर तालुक्यात चार ठिकाणी दिवसा घरफोड्या

नगर तालुक्यात चार ठिकाणी दिवसा घरफोड्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्याच्या ग्रामीण भागात गुरूवारी दुपारीच चोरट्यांनी धुमाकूळ घातला. कामरगाव, मठपिंप्री, खंडाळा शिवारात तीन ते चार ठिकाणी दिवसा घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व घरातील वस्तू चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोर्‍या, घरफोड्या, रस्तालुटीचे प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीबरोबर दिवसाही नागरिकांची घरे फोडले जात आहेत. गुरूवारी दिवसा तीन ते चार ठिकाणी घरे फोडण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या