Tuesday, December 10, 2024
Homeनगरनगर तालुक्यातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त

नगर तालुक्यातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील अनेक गावात गावठी हातभट्टी अड्ड्याचा सुळसुळाट झाला आहे. यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी ते अड्डे पुन्हा सुरू केले जात आहे. रविवारी नगर तालुका पोलिसांनी साकत गावचे शिवारात गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कारवाई दरम्यान तीन गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून कारवाईमध्ये 84 हजार रुपये किमतीचे एक हजार 200 लीटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व आठ हजार रुपये किमतीची 80 लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू जागीच नाश करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सदरची कारवाई केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या