Monday, May 20, 2024
Homeनगरनगर : आज १२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

नगर : आज १२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६८ टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९४५ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०५, श्रीगोंदा ०४,पारनेर ०१, अकोले १७, कोपरगाव ०२, कर्जत ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५१३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ८०, संगमनेर २७, राहाता ५८, पाथर्डी ३६, नगर ग्रा. ४२, श्रीरामपूर १५, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २३, अकोले ४६, राहुरी ३३, शेवगाव १५, कोपरगाव ४७, जामखेड ४०, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या