Saturday, November 23, 2024
Homeनगरबँकेचा अधिकारी चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

बँकेचा अधिकारी चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

‘अर्बन’ बँक घोटाळा || आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या आणखी एका अधिकार्‍याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. गुरूवारी (13 जून) दुपारी त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा पथकाने त्याला नगरमध्ये आणले. फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे. काही संचालक व अधिकारी, कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे. तसेच, इतर काही अधिकार्‍यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात डोळे यांच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज विभागात अधिकारी होते. दरम्यान, डोळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीनंतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या