Tuesday, May 21, 2024
Homeनगर‘अर्बन’च्या सस्पेन्स घोटाळ्याची 12 जुलैला सुनावणी

‘अर्बन’च्या सस्पेन्स घोटाळ्याची 12 जुलैला सुनावणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याची सुनावणी 12 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपी माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते व त्याची सुनावणी 21 जूनला होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्याचे कारण सांगून ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य करून 12 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे.

- Advertisement -

नगर अर्बन बँकेच्या सस्पेन्स खात्यातून 15 धनादेश वटवले गेले असून, यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहे. बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला पाच लाखाचा दंडही केला आहे. या पार्श्वभूमीवर सस्पेन्स खात्यातील या गैरव्यवहारांबद्दल चौकशीची मागणी होत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या