Thursday, April 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNagarparishad Election Result 2025 : धुळे जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला; शिरपूरात आ. अमरिश...

Nagarparishad Election Result 2025 : धुळे जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला; शिरपूरात आ. अमरिश पटेलांचा करिष्मा कायम, शिंदखेड्यात मात्र धक्का

पिंपळनेरमध्ये निर्विवाद सत्ता; डॉ.योगिता चौरे पहिल्या नगराध्यक्षा

धुळे | Dhule

जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीत भाजपाचा (BJP) बोलबाला असून दोंडाईचा नगराध्यक्षपद आणि सर्वच जागा यापुर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत. तर आज जाहिर झालेल्या निकालात शिरपूरात आ. अमरिशभाई पटेल यांचाच करिष्मा कायम राहिला असून नगराध्यक्षपदासह १६ प्रभागातील ३२ पैकी ३१ जागांवर विजय मिळवित विरोधकांना धुळ चारली. नगराध्यक्ष पदाचे उमदेवार चिंतनभाई अमरिशभाई पटेल (Amrish Bhai Patel) यांनी तब्बल १६ हजार ९५९ मतांनी शिवसेनेचे हेमंत पाटील यांना पराभुत केले. एमआयएमला १ जागेवर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

पिंपळनेर नगरपरिषदेच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या डॉ.योगिता चौरे यांची विजय मिळविला. त्यांना ७ हजार ३६६ मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या ललिता प्रेमानंद गायकवाड यांचा १ हजार ३६६ मतांनी पराभव केला. सदस्य पदाच्या एकुण १८ जागांपैकी भाजपा व शिवसेनेचे प्रत्येकी आठ आठ उमेदवार विजय झाले. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.

शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कलावती सुकलाल माळी यांनी विजय प्राप्त करीत इतिहास घडविला. त्यांनी भाजपाच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे यांचा पराभव केला. माळी यांना ६ हजार ९९१ मते मिळाली. तर वानखेडे यांना ६ हजार २०० मते मिळाली. एकूण १७ प्रभागांपैकी भाजपाला ११ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि कॉंग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : पोलिसांना ‘कल्पना’च नाही ! खरातची पत्नी दोन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेला संशयित अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याच्या गुन्ह्यांमध्ये आता त्याची पत्नी...