Sunday, September 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNagarparishad Election Result 2025 : नाशिक जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला; नगराध्यक्षपदी 'हे' ...

Nagarparishad Election Result 2025 : नाशिक जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला; नगराध्यक्षपदी ‘हे’ उमेदवार विजयी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते. यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत सर्वाधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज (दि.२१) रोजी मतमोजणी पार पडत असून, जिल्ह्यात महायुतीने मुसंडी मारली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील इगतपुरी, नांदगाव आणि सटाणा याठिकाणी नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.तर येवला, भगूर येथे राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदी उमेदवार निवडून आले आहेत. तसेच पिंपळगाव बसवंत आणि चांदवड याठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर सिन्नर येथे शिवसेना उबाठाचे प्रमोद चोथवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल वाजे यांच्यात अटीतटीची लढत सुरु आहे.

तर त्र्यंबकला शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार आणि भाजपचे कैलास घुले यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्याचबरोबर मनमाडमध्ये शिवसेना उबाठा आणि शिंदेची शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सामना सुरु आहे. येथे पहिल्या फेरीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण नाईक यांच्यापेक्षा 21 मतांनी तर दुसऱ्या फेरीत 701, तिसऱ्या फेरीत 2008, चौथ्या फेरीत 1412 आणि पाचव्या फेरीत 1500 ने पुढे आहेत.

नगराध्यक्षपदाचे आतापर्यंत विजयी झालेले उमेदवार

पिंपळगाव बसवंत – डॉ. मनोज बर्डे – भाजप
इगतपुरी – शालिनी खातळे – शिंदे सेना
नांदगाव – सागर हिरे – शिंदे सेना
भगूर – प्रेरणा बलकवडे – राष्ट्रवादी अजित पवार
येवला – राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी अजित पवार
सटाणा – हर्षदा पाटील -शिवसेना शिंदे

ताज्या बातम्या

Nashik News : ‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर; नाशिकमध्ये...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा (UNESCO) अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे...