येवला | Yeola
येवला शहरात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब केले आहे. आगामी काळात येवला शहराचा (Yeola City) सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य असणार असून येवला शहर हे राज्यातील रोड मॉडेल शहर म्हणून विकसित करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवल्यात केलेल्या विकासाला येवलेकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई मित्रपक्ष महायुतीला येवला नगरपालिकेत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदी राजेंद्र लोणारी यांचा ११६५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ११ व भाजपचे ३ असे महायुतीचे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहे.
या विजयानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा आजवर जो विकास केला आहे. त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ साहेब हे अनुपस्थित असल्याने सर्व निवडणूक ही कार्यकर्त्यांनी हातात घेतली. या निवडणुकीत मिळालेले हे यश कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचे यश आहे. आगामी काळात येवल्याच्या (Yeola) सर्वांगीण विकासासाठी आपण अधिक प्राधान्य देणार असून विविध विकासाची कामे यापुढील काळात मार्गी लावली जातील तसेच येवला शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगत सर्व येवलेकरांचे व अविरत काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे येवला शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयानंतर शहरभर जल्लोष साजरा करण्यात आला. या निवडणुकीत येवला शहरातील मतदारांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाला मत दिले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला शहराचा केलेला विकास आणि त्यांनी येवलेकरांना आगामी काळासाठी दाखवलेले विकासाचे व्हिजनसाठी येवलेकरांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला आहे.
विजयी उमेदवारांची यादी
नगराध्यक्षपदी
राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
नगरसेवक
प्रभाग क्र. १ ब – परवीन शेख (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ५ अ – जयाबाई जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ५ ब – जावेद मोमीन (लखपती) (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ६ अ – लक्ष्मीबाई जावळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.७ अ – प्रविण बनकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.८ अ – छाया क्षीरसागर (भाजप)
प्रभाग क्र.८ ब – दिपक लोणारी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१० अ – पारुल गुजराथी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१० ब – महेश काबरा (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.११ ब – कुणाल परदेशी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१२ अ – लक्ष्मी साबळे (भाजप)
प्रभाग क्र.१२ ब – शंकर (गोटू) मांजरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१३ अ – पुष्पा गायकवाड (भाजप)
प्रभाग क्र.१३ ब – चैताली शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)




