Friday, January 23, 2026
HomeUncategorizedNagarparishad Election Result 2025 : नांदगावमध्ये शिंदे सेनेचे तर येवल्यात राष्ट्रवादीचे ...

Nagarparishad Election Result 2025 : नांदगावमध्ये शिंदे सेनेचे तर येवल्यात राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष व १० प्रभागातून २० नगरसेवक रिंगणात होते .या निवडणुकीत प्रथमच शिदेसेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध झाले होते. त्यामुळे १३ जागेसाठी ३६ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार होते. यानंतर आता नांदगाव नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून, नगराध्यक्षपदासह शिंदे सेनेचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांचा करिष्मा दिसून आला आहे.

- Advertisement -

नगराध्यक्षपदी सागर हिरे हे विजयी झाले आहेत. तर येवला नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे १ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर त्र्यंबकेश्वर येथे नगराध्यक्षपदासाठी भाजपचे कैलास घुले आणि शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. दुसरीकडे त्र्यंबकला राष्ट्रवादीचे पाच आणि भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...