Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रNagpur Company Fire: कंपनीला भीषण आग; ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

Nagpur Company Fire: कंपनीला भीषण आग; ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

नागपुर | Nagpur

- Advertisement -

नागपुरच्या हिंगणा एमआयडीसीमध्ये (Hingana MIDC) एका कंपनीला भीषण आग (Company Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. कटेरिया ऍग्रो कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीत 20-30 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे.

या कंपनीला सोमवारी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या 3 कामगारांचा होरपळून मृत्यू (3 Worker’s Dead) झाला असून 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Happy Birthday Sachin : …अन् सचिन क्रिकेटचा देव बनला!
बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात; १७ जखमी

शेतातील तुराट्या-पराट्यापासून ब्लॉग्स बनवण्याचं काम कंपनीत केले जात असल्याने, गोडाऊनमध्ये असे तयार ब्लॉक ठेवण्यात आले होते. याच ब्लॉग्सला आग लागल्याने ही घटना घडल्याचं अग्निशामक विभागाने सांगितलं आहे. ही आग इतकी भीषण आहे की, दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे.

चार वर्षांपासून फरार संशयिताला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या तीन कामगारांना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या