Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींचा धुराळा उडणार; हायकोर्टाने दिला ग्रीन सिग्नल

राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींचा धुराळा उडणार; हायकोर्टाने दिला ग्रीन सिग्नल

मुंबई | Mumbai

राज्यातील तब्बल २,३६९ आणि जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचपदासाठीचे आरक्षण निश्चित करताना आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र, आता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने या आता निवडणुका घ्या, परंतु भविष्यात निवडणूक घेताना ही चूक सुधारा, असे आदेश पारित करीत न्यायालयाने आगामी ग्राम पंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ग्रामपंचायत निवडणुकांचा दिवाळीपूर्वी या बार उडणार आहे. या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरीसुद्धा आगामी लोकसभेपूर्वी या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

Sushma Andhare : “ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन”; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

दरम्यान, याचिकाकर्ते गुणवंत काळे यांनी या निवडणुकांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर गेल्या आठवड्यात न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने आदेश राखीव ठेवला होता. त्यावर आज निकाल देण्यात आला असून आगामी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून भविष्यात ही चूक सुधारण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेत.

कसा आहे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ दाखल करण्यात येणार, नामनिर्देशनपत्रांची २३ ऑक्टोबर २०२३ छाननी होईल, नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मागे घेण्याचा दिनांक, चिन्ह वाटप दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील, ५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल, मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच होणार, तर, मतदानाची वेळ अन् ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या