Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र'नासा' मध्ये नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक; तब्बल 'इतक्या' कोटींना लुबाडले

‘नासा’ मध्ये नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ कोटींना लुबाडले

नागपूर | Nagpur

- Advertisement -

सर्वसामान्यांना अनेकदा वेगवेगळी आमिषे दाखवून लुटण्याचे प्रकार घडतात. मोठ्या पगाराची नोकरीचे आमिष देऊन अनेक बेरोजगार तरुण तरुणी आमिषाला बळी पडतात. असाच एक प्रकार नागपूरमध्ये (Nagpur) पुन्हा एकदा घडला आहे. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासा (Fake Job In Nasa) मध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून एक दोन जणांची नव्हे तर तब्बल १११ जणांची फसवणूक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुक करणाऱ्याचे नाव ओमकार तलमले असे असून त्याने तब्बल १११ जणांची ५ कोटी ३१ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ओमकारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार तलमले याने २०१७ पासून नासामध्ये वैज्ञानिक म्हणून सांगितले होते. तो त्याच्या संपर्कातल्या तरुणांना (Youths Deceived) नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देतो अशी स्वप्न दाखवत होता.

Crime News : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने सपासप वार

ओमकारने पैशांचे आमिष दाखवून एका आठवड्यापूर्वी नागपूर शहरातील दोन व्यापारांची काही गुंडांच्या मदतीने अपहरण करून कोंढाली जवळ हत्या केली होती आणि त्यानंतर दोघांचे मृतदेह वर्धा जिल्ह्यातील नदीत फेकून दिले. याप्रकरणी ओमकारला नागपूर पोलिसांकडून अटक झाल्यानंतर हिंमत बळावलेल्या तरुणांनी समोर येऊन फसवणुकीची नागपूर शहर पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा हा प्रकार समोर आलाय.

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद

या तरुणांकडून त्याने टप्प्या टप्प्याने लाखो रुपये उकळले. त्याने अनेक तरुणांना नासाच्या खोट्या लेटरपॅडवर नोकरीचे अपॉइनमेंट लेटरही पाठवले. सध्या ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या