Saturday, May 4, 2024
Homeराजकीयनागवडे पुन्हा थोरात कंपूत

नागवडे पुन्हा थोरात कंपूत

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

नागवडे कुटुंबीयांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक मानले जातात. मात्र कोविड सेंटर आणि स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळा उद्घाटनासाठी राजेंद्र नागवडे यांनी भाजप नेत्यांना टाळले. उदघाटन कार्यक्रमात खासदार डॉ.सुजय विखे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचा उल्लेख देखील कार्यक्रम पत्रिकेत टाळला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.

- Advertisement -

अलिकडे नागवडे सोयीनुसार नेते बदलत असल्याचे दिसून आले आहे. श्रीगोंदा कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे मागील विधानसभेला भाजपमध्ये आले. त्यांना खासदार सुजय विखे यांनी शब्द दिला होता. मात्र जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे काँगेसमध्ये आणि राजेंद्र नागवडे भाजपमध्ये असे दोन पक्ष एकाच घरात होते. नागवडे कुटुंबाने कोविड सेंटर सुरू करताना उदघाटन कार्यक्रम आणि स्व.शिवाजी राव नागवडे यांच्या पुतळ्याचे उद्घाटन कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते केला. खासदार डॉ.सुजय विखे याचे नाव कार्यक्रम पत्रिकेतून वगळले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या