Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनाईक महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

नाईक महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

नाशिक | Nashik

येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (Krantiveer Vasantrao Narayanarao Naik) शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक येथे दि.२४ मार्च २०२३ रोजी, ‘वसंत करंडक’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे (State Level Elocution Competition) आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

मराठी भाषेत होणार्‍या  या वक्तृत्व स्पर्धेसाठी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक : जीवन व कार्य, शिक्षण धोरणात गरीबांचे स्थान, लोकशाही : लोकांची की शाही लोकांची, अमृत महोत्सवातील भारत आणि इंडिया, राजकारण : सुडाचे  की विकासाचे, समाज माध्यमे : सामाजिक की असामाजिक हे विषय आहेत.

सोशल मिडियासाठी केंद्राने जारी केली ‘हि’ मार्गदर्शक तत्वे

कोणत्याही विद्याशाखेत पदवी  व पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या तसेच  महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील (College) विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येअणार आहे. दरम्यान, स्पर्धकांना ८ (६+२ ) मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धेचे शुल्क  प्रति स्पर्धक १००/- रु. असून महाविद्यालयातून किमान एक किंवा जास्तीत जास्त दोन विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी

प्रत्येक स्पर्धकाने आपल्या महाविद्यालयाच्या सहभागाबाबतचे पत्र व स्वत:चे ओळखपत्र (Identification card) आणणे  बंधनकारक असणार आहे. वसंत करंडक स्पर्धकाच्या एकूण गुणधिक्यावर दिला जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक (prize) करंडक व रु. ७००१/-, द्वितीय पारितोषिक रु. ५००१/- तृतीय पारितोषिक रु. ३००१ /- व उत्तेजनार्थ पारितोषिक रु. १००१/- देण्यात येतील. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप, संयोजिका प्रा. डॉ. नंदादेवी बोरसे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या