Friday, May 31, 2024
Homeनगरनामको कालवा खोपडीच्या प्रकल्पबाधितांना 2 कोटी 17 लाख भरपाई

नामको कालवा खोपडीच्या प्रकल्पबाधितांना 2 कोटी 17 लाख भरपाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्याच्या (Kopargav Taluka) पूर्व भागातील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या (Nandur Madhyameshwar fast canal) वितरिका क्र. 1 व 2 च्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न (The question of compensation for land acquisition) केलेल्या पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात लौकी येथील जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना यापूर्वी 61 लाख 87 हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे. उर्वरित शेतकर्‍यांना देखील भरपाई मिळवून देणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्यातून खोपडी (Khopadi) येथील एकूण 22 प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना 2 कोटी 17 लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिली आहे.

नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याची निर्मिती (Nandur Madhyameshwar fast canal) झाल्यापासून कोपरगाव तालुक्याच्या (Kopargav Taluka) पूर्व भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या (Nandur Madhyameshwar fast canal) वितरिका क्र. 1 व 2 च्या भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित होता. शेतकर्‍यांच्या अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेऊन वेळोवेळी जिल्हाधिकार्‍यांसमवेत (Collector) नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या (Nandur Madhyameshwar fast canal) सर्व अधिकारी, भू-संपादन अधिकारी (Land Acquisition Officer) यांची संयुक्त बैठक घेऊन येणार्‍या अडचणी दूर केल्या होत्या.

त्यामुळे या प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या अधिग्रहित करण्यात आलेल्या जीमिनीची 2013 च्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार (दि. 10) रोजी एकूण 22 प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या जमिनीची खरेदी करण्यात आली असून त्यांना 2 कोटी 17 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. आजपर्यंत 2 कोटी 78 लाख रुपयांची भरपाई या शेतकर्‍यांना मिळाली उर्वरित शेतकर्‍यांना देखील लवकरच भरपाई मिळवून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh kale) यांनी सांगितले आहे.

अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवून न्याय मिळवून दिल्याबद्दल घोयेगाव (Ghoyegav), गोधेगाव (Godhegav), तळेगाव (Talegav), लौकी (Lauki), धोत्रे (Dhotre), खोपडी (Khopadi), भोजडे (Bhojade) आदी गावांतील प्रकल्पबाधित शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh kale) यांचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या