Sunday, June 23, 2024
Homeनाशिकनामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शांताराम निकम बिनविरोध

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शांताराम निकम बिनविरोध

अंबासन | वार्ताहर

- Advertisement -

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शांताराम निकम यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पध्दतीनुसार विद्यमान सभापती संजय भामरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून रिकाम्या झालेल्या पदासाठी संचालक मंडळाच्या संमतीने निवडणूक निर्णय अधिकारी महेश भडांगे यांच्यासमोर निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने निकम यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले…

मावळते सभापती इंजी संजय भामरे यांना पदाची सुत्र देतांना सांगितले की, माझ्या काळात बाजार समितीच्या प्रशासकीय ईमारतीचे काम प रंगतीपथावर आले असून बाजार समिती आवारात फेवरब्लॉकच्या कामाचे उदघाटन सुद्धा झाले आहे.

गेट बसविण्याचेदेखील काम झाले. करंजाड उपबाजारात शेडचे काम असे अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्या कामी संर्व संचालक मंडळाने मोलाचे सहकार्य केले. तसेच उर्वरित कामासाठी विद्यमान सभापती निकम यांना नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बाजार समितीच्या विकासासाठी सर्व संचालक मंडळ हमाल, मापारी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन विकासाचा गाडा असाच चालू राहील. मला सर्वानुमते कोनताही विरोध न करंता सभापती केल्याबददल सर्वाचा आभारी असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले.

यावेळी भाऊसाहेब भामरे, चारूशिला बोरसे, भाऊसाहेब आहिरे, कृष्णा भामरे, अविनाश सावंत, दीपक पगार, लक्षण पवार, अविनाश निकम, आनंदा मोरे, हेमंत कोर, दत्तु बोरसे, सचिव संतोष गायकवाड सह संचालक कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या