Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांचा भाजपला टोला; ट्विट करत म्हणाले...

शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांचा भाजपला टोला; ट्विट करत म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शिवरायांनी वापरलेली वाघनखं (Shivaji Maharaj) ही भारतात परत आणण्याच्या चर्चा सुरु आहेत. ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये आहेत. आधी शिवरायांची जगदंबा तलवार (Jagadamba Sword) आणि वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वत: वाघनखे आणायला लंडनला जाणार आहेत. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना डिवलचे आहे.

आफ्रिकन युनियनला मिळालं स्थायी सदस्यत्व; आता जी-२० नाही तर जी-२१, पंतप्रधान मोदींची घोषणा

अशातच वाघनंखासंबधित त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलये की, “मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन…जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा….”

छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वाघनखांचा वापर करत अफजल खानाचा वध करत त्याचा कोथळा बाहेर काढला. आजही ही वाघनखे भारतीयांसाठी खास आकर्षण आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली जी लवकरच भारतात येणार आहे यासाठी सर्वच लोक उत्सुक आहेत.

किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून लवकरच होणार चौकशी?

मात्र याच वाघनखांचे उदाहरण देत आता नानांनी सरकारवर टीका केली आहे. ज्याप्रकारे शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तसाच आता या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढावा असे नाना पाटेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. , उलट विरोधी व सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या