Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याNana Patole : "कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या..."; मुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोलेंचे मोठे...

Nana Patole : “कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या…”; मुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

मुंबई | Mumbai

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरुन (Chief Minister) महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात अनेक घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल इच्छा बोलून दाखवल्याने त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे…

- Advertisement -

“देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

नाना पटोले यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील (Sambhajinagar District) वेरुळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारुती देवस्थानात दर्शन घेतले. तसेच खुलताबाद शहरातील (Khultabad City) जरी बक्ष या दर्ग्यावर देखील चादर चढवली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सध्या श्रावण महिना सुरु असून हिंदू संस्कृतीमध्ये हा धार्मिक महिना समजला जातो. आम्ही कोणासारखा दिखावा करत फिरत नाही. तसेच मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचे कोणतेही काम होत नाही. त्यामुळे जे सर्व धर्माचे प्रतीक आहे, त्या ठिकाणी मी दर्शनासाठी जातो. असे त्यांनी म्हटले.

अखेर राहुल गांधींना खासदारकी बहाल! १३६ दिवसांनी संसदेत येणार

तसेच नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता ते म्हणाले की, “कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या मनात हा विचार येत असेल तर ही दैवी कृपा आहे. लोक या श्रद्धेने काम करतात. शेवटी देव कोणालातरी निमीत्त करत असतो, देवाला मला निमीत्त करून अजून काही चांगले करून घ्यायचे असेल तर तो देवांचा अशीर्वाद असतो. मनुष्य हा कृती आणि कर्म करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे जे काही कोणाच्या मनोकामना, सोबती आणि चाहत्यांच्या इच्छा असतील ती पूर्ण होवो” असे नाना पटोले म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा पटोले यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा समोर आली असल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्यात पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या