Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधनानांच्या उत्कर्षात शनी रेषा आडवी

नानांच्या उत्कर्षात शनी रेषा आडवी

नाना पटोले यांचा जन्म 5 जून 1963 रोजी झाला, ते 5 फेब्रुवारी 2021 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. या नियुक्तीपूर्वी ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व केले. 2017 मध्ये त्यांनी भाजप आणि लोकसभेचा राजीनामा दिला. 11 जानेवारी 2018 रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत, त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून मतदारसंघात निवडणूक लढवली आणि जिंकले. त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा 149,254 मतांनी पराभव केला. ते 2009 ते 2014 या काळात साकोलीचे विधानसभेचे सदस्यही होते. ते ओबीसीसाठी लढतात. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा पत्र सादर करून लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

- Advertisement -

उत्कर्षात शनी रेषा आडवी

नाना पटोले यांचा उजवा सक्रिय हात उपलब्ध झाल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीची उत्सुकता होती. काँग्रेसचे प्रवक्ते असल्याने त्यांचे रोज दर्शन मीडियावर होते. काँग्रेसच्या विचारधारेचा प्रभाव पटोले यांच्यावर होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, प्रफुल्ल पटेल यांचा नाना पटोले यांनी दीड लाखाच्या मताधिक्याने दारुण पराभव केला. त्यावेळेस ते बीजेपीचे उमेदवार होते. नाना सध्या साठ वर्षाचे आहेत, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा मान सन्मानाचा काळ सध्या त्यांचा चालू आहे, त्यामुळे त्यांना फुरसत नाही, ते सध्या प्रचंड कामात व्यस्त आहेत. या साठ वय वर्षात त्यांच्या आयुष्य रेषेतून भाग्य रेषेचा उगम होत आहे व ती चंद्रावरून येणार्‍या भाग्य रेषेत जाऊन मिळत आहे. आयुष्य रेषेतून उगम पावलेली ही भाग्य रेषा उत्कर्ष रेषेचे सुद्धा कारकत्व दाखवीत आहे व त्यामुळेच सध्या नाना ‘मिडिया पे छा गये है’. परंतु वयाच्या साठ वर्षानंतर नाना यांच्या हातावर परत इतकी उतुंग उत्कर्ष रेषा नाही. रोज त्यांचेकडून त्यांच्या विरोधकांसाठीची बातमी असते, त्याला मीडिया मोठी प्रसिद्धी देते. सध्या ते राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना व बीजेपीच्या विरोधात मोर्चा उघडून बसले आहेत.

हस्तरेखाशास्त्रात हातावरील शुभ-अशुभ ग्रहांचा प्रभाव व्यक्तीवर होत असतो. बोटांखालील चार ग्रह अनुक्रमे गुरु, शनी, रवी व बुध यांना स्थान आहे. हातावरील पहिली आडवी रेषा म्हणजे हृदय रेषा ही या चारही ग्रहांचे सीमांकन करते. हातावरील चारही बोटांत त्या-त्या ग्रहाचे तत्व सम्मिलीत असते. हातावरील मनगटाकडून येणार्‍या प्रमुख व गौण प्रभाव रेषा बोटांखालील ग्रहांवर जातात त्या त्या ग्रहाच्या नावाने ओळखल्या जातात. हातावरील बोटांखालील चार प्रमुख ग्रहा व्यतिरिक्त, हृदय रेषा व मस्तक रेषेच्या मध्यावरचा मंगळ ग्रह, अंगठ्याच्या व आयुष्य रेषेच्या आत गुरु ग्रहाखाली वरच्या मंगळाचे स्थान असेल. मनगटापासून दोन फुगीर उभार तळहातावर असतात त्या पैकी उजव्या हातावर डाव्या बाजूला करंगळीच्या सरळ रेषेत मस्तक रेषेखाली चंद्र ग्रहाला स्थान आहे. मनगटापासून उजव्या बाजूस आयुष्य रेषेच्या आत व अंगठ्याच्या पेरापर्यंत शुक्र ग्रहाला स्थान असते. हाताच्या आकारानुसार व ठेवणीनुसार हातावरील ग्रहांचे उभार कमी जास्त प्रमाणात आढळून येतात. हातावरील ग्रहांचे उभार व त्यांच्या आकार मानाप्रमाणे ग्रहांचे बलाबल असते. ग्रहांचे बलाबल हे ग्रहांच्या आकारावरूनही काढतात व ग्रहावर येणार्‍या रेषा व चिन्हे याद्वारे सुद्धा एकूण गुण किती ते काढता येते. तळहाताकडे पाहिले की ग्रहांचे उभार आधी नजरेस येतात, त्यानंतर त्या ग्रहांवर असणार्‍या रेषा, चिन्ह याद्वारे त्या व्यक्तीचा भाग्याचा लेखाजोखा काढता येतो. भाग्य पाहताना त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सुख-दुःखे, वेदना, याचा कालनिर्णय करता येतो.

व्यक्तिमत्वातील बारीक सारीक पैलू उमजून येतात, त्यात मुखतः स्वभाव, स्वभावातील गुण – दोष कोणते ते ज्ञात झाल्याने व्यक्तीला त्याच्या आयुष्यात स्वभाव दोषा बद्दल मार्ग दर्शन करता येत. व्यक्तीचा आशा आकांक्षा व वागणूक कळते, त्याची आवड निवड ही जाणता येते. व्यक्तीचे हे स्वभाव दर्शन हातावरील मुखतः ग्रह पाहिल्यावर लक्षात येतात. रेखा शास्त्राप्रमाणे कुठलाही ग्रह हा आकाराने सरासरीपेक्षा अधिक मोठा उभार घेतलेला असला की त्या ग्रहात न्यूनता येत असते, म्हणजेच त्या ग्रहांचे दोष अधिक मात्रेत समाविष्ट असतात. नाना यांच्या हातावरील गुरु ग्रह अधिक प्रमाणात विस्तृत आकाराचा आहे, पहिल्या बोटाखालील हा गुरु ग्रह विद्वत्ता प्रदान करीत असतो, परंतु ग्रह अधिक उभार घेतलेला असता गुरु ग्रह त्या व्यक्तीत अहं ब्रह्मासि मी म्हणतो तेच खरे चे गुण प्रदान करतो. हे लोक दुसर्‍याचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात, हेही खरे आहे की ते अत्यंत हुशार व विद्वान असतात.

नाना यांच्या गुरु ग्रहाबरोबरच मनगटावरील चंद्र व शुक्र या ग्रहांचा उभार मोठा आहे, सहाजिकच या दोन ग्रहात न्यूनता आली आहे. चंद्र ग्रह हा कल्पना देतो, विचार शक्ती, नियोजन कल्पनेत ठरवलेले असते, चंद्र ग्रहावरील अधिकचा उभार मनासारखे काम झाले नाही की अस्वस्थ करून सोडतो. ह्या चंद्र ग्रहाच्या अस्वस्थेमुळे नाना बीजेपी पक्षात त्यांच्या मनासारखे घडत नसल्याने खासदारकीचा राजीनामा देऊन परत काँग्रेसवासी झाले. नाना यांच्या हातारील शुक्र ग्रहाचा उभारही मोठा आहे, शुक्र ग्रह ऐटबाजी देतो, चार चौघात खुलून दिसण्याचे कारकत्व बहाल करतो. चंद्र व शुक्र अधिकचा उभार व्यक्तीच्या हातावर असेल तर हे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत उतावीळ असतात, त्यांच्या मनासारखे कधी होईल याची ते आतुरतेने वाट पहातात. मनासारखी कामे पूर्णत्वात नेण्यासाठी कष्ट घेतात. परंतु नियती कठोर असते, ती तुमच्या मनाप्रमाणे व कल्पनेप्रमाणे माप तुमच्या पदरात टाकीत नाही व वेळ आल्याशिवाय कामही पूर्णत्वास जाऊ देत नाही त्यासाठी दैवाची साथ लागते.

हस्तरेषाशास्त्राप्रमाणे मधल्या बोटाखाली, म्हणजे शनी ग्रहावर आडव्या रेषा आल्या की, व्यक्तींची होणारी कामे अडतात. शनी ग्रहावर हृदय रेषेचा एक स्वतंत्र तुकडा शनी ग्रहाला ग्रासत असेल तर अश्या लोकांची दहा पैकी चार कामे अटकून राहतात. नाना यांच्या हातावरील शनी ग्रहाच्या मध्यापर्यंत ठळक आडवी रेषा गुरु-शनी बोटाच्या पेरातून निघून, अर्ध गोल होऊन शनी ग्रहावर आडवी आहे. ही रेषा नानांना त्यांच्या आयुष्यात उतुंग भरारी घेण्यापासून रोखण्याचे काम करीत आहेत. नाना यांचेकडे विद्वता, हुशारी, कुशल नेतृत्व, जनाधार असून सुद्धा नाना यांना त्यांच्या आयुष्यात शनी रेषा कायमची आडवी येत रहाणार आहे. अशीच शनी ग्रहावरची आडवी रेषा मा. अजित पवार यांचे हातावर आहे, परंतु ती नानांच्या हातावरील रेषे पेक्षा खूपच पातळ व कमजोर आहे आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अडथळे उशिरा का होईना पार करीत आहेत. शनी ग्रहावरील आडवी स्वतंत्र रेषा जितकी गडद तितकी ती अधिक त्रासदायक असते व होणार्‍या कामात विलंब लावते. शनी ग्रहाला किती मोठ्या प्रमाणात आडवी रेषा ग्रासते त्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या नशिबी ती आडवी असते, मेहनत कष्ट करूनही त्याचे चीज होत नाही, किंवा कामे होत नाहीत ते दीर्घकाळ लटकतात. ह्या शनी ग्रहावरील आडव्या रेषेच्या निराकारणासाठी हस्तरेखा शास्त्रात सटीक उपाय आहेत. ते केले की बर्‍यापैकी आयुष्यातील अडथळे कमी होतात. नाना यांच्या हातावर आयुष्य रेषेतून उगम पावून थेट बुध रवी ग्रहाच्या पेरात गेली आहे, ही रेषा नाना यांची रवी बुध कारकत्वाची रेषा आहे. या रेषेमुळे नाना यांचे पक्ष श्रेष्ठींवर कामाचा ठसा, निष्ठावान व हुशार कार्यकर्ता म्हणून, छाप पाडण्याचे काम चोख करीत आहे. तिसर्‍या व चौथ्या बोटाच्या पेरात बुध-रवी ची रेषा गेल्याने त्यांच्या हजरजवाबी बाण्यात व त्यांचेबरोबर त्यांच्या मान सन्मानात वृद्धी करीत आहे. हातावरील कुठलीही रेषा बोटांच्या तिसर्‍या पेरात जाऊन रुतली तर ह्या रेषेचे गुणधर्म कमी होतात व व्यक्ती स्वतःला पुढे करण्यात व चर्चेत राहण्यासाठी कायम प्रयत्न करते, मान सन्मान मिळविण्याचा आटोकाट प्रयत्नात राहते. परंतु हातावरील शनी ग्रहावरील आडवी रेषा प्रयत्नात लवकर सफल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या