घोटी | वार्ताहर | Ghoti
देशाचा मूळ मालक हा आदिवासी (Tribals) असून ते राज्याचे रहिवासी आहेत. या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेसचे सरकार (Congress Government) येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेचे पैसे (Money) लुटण्याचे कार्यक्रम या सरकारने केला आहे. त्यामुळे या काळ्या भ्रष्ट सत्तेला वेळीच आवर घालण्याची वेळ आली आहे. लाडकी बहीण योजनेचे गाजर दाखवून दाळी, तेल, गॅस, लाईट बिल याचे भाव वाढून दिले आहेत. त्यामुळे हे भाऊ नसुन बैमान आहे. मोदी सरकार आल्यापासून जातीय जनगणना बंद झाल्या आहेत. आदिवासी समाजाचे आरक्षण संपविण्याचे काम भाजप करत आहे आणि यापुढे देखील आदिवसींचे आरक्षण संपविण्याचा काम भाजप करणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election Date 2024 : विधानसभेचे बिगुल वाजले; एका टप्प्यात होणार मतदान
केंद्र व राज्य शासनाकडून शेतकरी व आदिवासी कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाडीवऱ्हे (Wadivarhe) येथे भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात पटोले बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, भाजप सरकार (BJP Government) आदिवासींना किडेमकोडे समजत आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातमध्ये (Gujarat) नेले आहेत. गरिबांचे पैसे अडाणी अंबानीच्या घरी टाकले जात आहेत. काँग्रेसच्या काळात देशात सर्वच सुविधा पोहचविल्या जात होत्या. मात्र भाजप गरिबांचे शिक्षण हिरावून घेत असून गुलामीकडे नेण्याचे काम करत आहे. देश वाचविण्यासाठी आपसातला मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी महाविकास आघाडीचे काम केले पाहिजे. वनजमिनीचे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मी पंधरा दिवस जेलमध्ये राहिलो असून यापुढे मी वनजमिनीचा उतारा प्रत्येक आदिवासी बांधवासाठी देणार आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Jharkhand Assembly Election Date 2024 : झारखंडमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभेची निवडणूक; मतदान आणि निकाल कधी?
तर कार्यक्रमाचे उदघाटक आणि काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithalla) म्हणाले की, आदिवासींना जल जंगल जमीन देण्याच काम काँग्रेस पक्षाने केले आहे. भाजप जातीय राजकारण करून दंगली घडविण्याचे काम करत आहे. मात्र काँग्रेसने कधीच जातीच राजकारण केले नाही. आदिवासी समाजाच्या हितासाठी काँग्रेस सर्वतपरी प्रयत्न करत आहे. आमचं सरकार आले तर आदिवासी समाजासाठी सदैव झटत राहील , असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : By Election Date 2024 : नांदेड, वायनाड लोकसभेसह ४८ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक; ‘या’ दिवशी होणार मतदान
दरम्यान, या निर्धार मेळाव्याचे आयोजन इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे आदिवासी प्रदेश उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, आदिवासी प्रदेश अध्यक्ष बळवंत गावित यांनी केले होते. या मेळाव्याला आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गोपाळ लहांगे यांनी केले. सदर मेळाव्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथल्ला, आदिवासी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रभारी निजामुद्दीन सैय्यद, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, राहुल दिवे, आकाश छाजेड, भास्कर गुंजाळ, इगतपुरीचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा : MVA Seat Sharing : मविआचा जागावाटपाचा ‘असा’ आहे संभाव्य फॉर्म्युला; सपा, शेकापला किती जागा मिळणार?
संपत सकाळे यांचा काँग्रेसला रामराम, मात्र ८० टक्के कार्यकर्ते म्हणतात आम्ही पक्षासोबतच
काल (सोमवार) आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP) पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत सकाळे यांनीही पक्षप्रवेश केला.गेली ३५ वर्ष सकाळे हे काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत होते.जवळपास दहा वर्षांपासून त्यांच्याकडे त्र्यंबकेश्वर तालुका इंदिरा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा होती.मात्र, काल त्यांनी आमदार खोसकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र, असे असले तरीही त्र्यंबक तालुक्यातील ८० कार्यकर्ते म्हणतात की आम्ही काँग्रेससोबत आहोत. इगतपुरी विधानसभेत आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये सरासरी काँग्रेस पक्षच प्रबळ ठरलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला पाहता आम्हाला पक्ष सोडण्याची गरज नाही असे निष्ठावान कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात नेते दुसरीकडे गेले असले तरी त्र्यंबक तालुक्यातील कार्यकर्ते मात्र पक्षाला धरून असल्याचे दिसत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा