Monday, April 28, 2025
Homeनाशिकमराठी नववर्षानिमित्त नंदिनी नदी ते पाथर्डी शोभायात्रा

मराठी नववर्षानिमित्त नंदिनी नदी ते पाथर्डी शोभायात्रा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याला (Gudipadwa) शिवसेना प्रणित सकल हिंदू नववर्ष स्वागत यात्रा-२०२२ शोभा यात्रेचे (Shobhayatra) आयोजन करण्यात आले आहे…

- Advertisement -

यावेळी दुपारी ५.०० वाजता शारदा शाळेच्या मैदानावरून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून राजीव नगर, कलानगर, रथचक्र, बापु बंगला, इंदिरानगर मार्गे सुखदेव शाळेच्या मैदानावर यात्रेचा समारोप होईल.

या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची १३ फुटी मूर्ती आकर्षण ठरणार आहे. यावेळी रणरागिणींची वेशभूषा, लेझीम पथक, महिला दांडिया पथक, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, प्रभु रामचंद्रांचा भव्य देखावा, पारंपरिक ढोल ताशांचा गजर आदींसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून पुढचे तीन दिवस दररोज दुपारी ३.०० ते ४.३० वाजे दरम्यान भागवत सभागृह, चेतनानगर येथे महिलांसाठी दांडिया व लेझीम खेळण्याचा मोफत सराव होणार आहे. तसेच समारोपाच्या ठिकाणी “महाराष्ट्राची लोकधारा” या संगीत नृत्यमय कार्यक्रमाचे सादरीकरण रॉयल डान्स अकॅडमीच्या (Royal Dance Academy) वतीने करण्यात येणार आहे.

स्वागत यात्रा समितीच्या वतीने खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी महिला उद्योजिका, गृहिणी आणि बचत गटांसाठी समारोपाच्या ठिकाणी मैदानावर मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तरी नंदिनी नदी ते पाथर्डी शिवारातील सर्व महिलांनी या नववर्ष शोभायात्रेत सहभागी होऊन नव्या विचारांची, सकल हिंदू एकतेची गुढी उभारावी असे आवाहन सकल हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने अमोल जाधव ,देवानंद बिरारी, निलेश साळुंखे, सागर देशमुख, विनोद दळवी, दत्ता दंडगव्हाळ, प्रमोद लासुरे, संजय गायकर,संजय काळे, शोभा दोंदे, ऋषी वर्मा, सुरेंद्र कोथमिरे, संगीता जाधव, वंदना बिरारी, पूजा देशमुख, वर्षा कोथमिरे, मनीषा साळुंखे, शालिनी गायकर, प्रतीक्षा दंडगव्हाळ, वर्षा लासुरे, वैशाली दळवी, डॉ पल्लवी जाधव, ललिता काळे, विठाबाई पगारे आदींनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...