कोहोर | वार्ताहर
पेठ तालुक्याच्या शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार पडून कोहोर मविआ गटाचे विधानसभा प्रमुख नंदूभाऊ गवळी यांच्या गट, गणातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथे दि.२५ रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी कुंटुंब व कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, डॉ. प्रशांत बदाणे, सुनील बच्छाव, व प्रमुख कार्यकारिणीच्या उपस्थितीत आणि माजी खासदार भारती ताईं यांच्या नेतृत्वामध्ये महाआघाडी गटाचे विधानसभा प्रमुख व उबाठा कोहोर गटाचे प्रमुख नंदुभाऊ गवळी यांच्यासह व कोहोर गटातील तसेच पेठ तालुक्यातील विविध प्रमुख पदाधिकारी व गट प्रमुख, गण प्रमुख आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते दिलीप चौधरी, रघुनाथ गवळी, शशीकांत भुसारे, नितीन गायकवाड, शशिकांत गावंढे, मधुकर गुंबाडे, प्रविण पोटिंदे, रामदास चारोस्कर व कोहोर गटातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला.नंदुभाऊ गवळी यांच्या पक्ष प्रवेशाने गेल्या पंधरा वर्षांपासून एकहाती ताब्यात असलेला कोहोर गटामध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याने राजकीय नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा