Monday, September 7, 2026
HomeनगरSangamner : नांदूर खंदरमाळ शिवारात साडेचार टन मांगूर मासे पकडले

Sangamner : नांदूर खंदरमाळ शिवारात साडेचार टन मांगूर मासे पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारात केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या मांगूर माशांची वाहतूक करणारा ट्रक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घारगाव पोलिसांच्या मदतीने पकडला. या कारवाईत 4 हजार 500 किलो मांगूर माशांसह 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.2) केली.

- Advertisement -

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, भीमराज खर्से, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन संगमनेर तालुका हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणेकामी रवाना केले.

सदर पथक रविवारी घारगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत ट्रकमध्ये (क्र. डब्ल्यूबी.25, एम.5048) केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरुन तो पुणेच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तत्काळ घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर यांना बोलावून घेत नांदूर खंदरमाळ शिवारामध्ये सापळा रचून ट्रक पकडला. तेव्हा ट्रकमध्ये साडेचार हजार किलो मांगूर मासे मिळून आले.

या कारवाईत सुकुमार दुलाल घोष (वय 47, रा. पुतीया, नॉर्थ 24 परगणा, पुतीया, पश्चिम बंगाल), तारक दिलीप सरकार (वय 27, रा. नेहरुबाग, रेल्वेलाईन, हाबरा, नॉर्थ, 24 परगणा, पश्चिम बंगाल), सद्दाम रजरुल सरदार (वय 33, रा. बारघरीया, सरुफनगर थाना, नॉर्थ 24 परगणा, पश्चिम बंगाल), अझरुल आयजुल मंडल (वय 36, रा. बारघरीया, सरुफनगर थाना, नॉर्थ 24 परगणा, पश्चिम बंगाल) हे मिळून आले. त्यांनी हे मासे कोठून आणले व कोणाकडे घेवून जाणार आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचे मासे मोन्टू मंडला (रा. मोगरा, बागजुला, बाटुडिया, जि. बाशिरहट, पश्चिम बंगाल) याने भरुन दिलेले असून ते गणेश गायकवाड (रा. पुणे, पूर्ण पत्ता माहित नाही) याच्याकडे घेवून जात असल्याची माहिती दिली.

मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांच्याशी संपर्क करुन त्यांच्यासह दत्तात्रेय मिसाळ या दोघांनी ट्रकमधील माशांची खात्री करत प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिला. 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 4500 किलो प्रतिबंधित मांगूर मासे व 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन नाश केला आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एसटी बसमध्ये धाडसी चोरी; गर्दीचा फायदा घेणाऱ्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik लासलगाव ते निमाणी मार्गावर (Lasalgaon and Nimani Highway) धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील...