करोना उपचारासाठी जिल्ह्याला 10 हाय फ्लो मशिन प्राप्त

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

करोना उपचारात व्हेंटीलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाला एनएसई फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून 10 हाय फ्लो नेझल कॅन्युला मशिन (एचएफएनसी) प्राप्त झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची अधिक प्रमाणात आवश्यकता असते. अशावेळी व्हेंटीलेटर्सद्वारे मिळणारा ऑक्सिजनही कमी पडू शकतो.

व्हेंटीलेटरला एचएफएनसी जोडल्याने ऑक्सिजनचा प्रवाह अधिक प्रमाणात होतो व रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने त्याचे प्राणदेखील वाचविता येतात.

जिल्हा शासकीय रुग्णालीयात पीएम केअर फंडातून प्राप्त झालेल्या 48 व्हेंटीलेटर्ससाठी ही सुविधा होती.

रुग्णालयातील इतर 10 व्हेंटीलेटर्ससाठी एनएसई फाऊंडेशनने एका संयंत्रासाठी 4 लाख 31 हजार याप्रमाणे 43 लाख रुपये किंमतीचे एचएफएनसी उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी पूर्ण क्षमतेच्या 58 व्हेंटीलेटर्सची सुविधा झाल्याने त्याचा रुग्णांच्या उपचारासाठी चांगला उपयोग होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *