Saturday, June 29, 2024
Homeनंदुरबारव-हाडाच्या ट्रकला अपघात

व-हाडाच्या ट्रकला अपघात

नंदुरबार – Nanadurbar – प्रतिनिधी :

- Advertisement -

लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वटबारेजवळ घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील लग्नाचे वऱ्हाड घेवून नंदुरबार तालुक्यातील खापरखेडा येथे ट्रक (क्र.जी.जे.०७ झेड ९८२७) जात होता. वटबारेमार्गे ट्रक जात असतांना वाहन चालक अरविंद ठाकरे याचा एका वळणावर ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर २९ जण जखमी झाले. अपघात घडल्यानंतर वाहन चालक अरविंद ठाकरे हा पसार झाला.

अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने तसेच रुग्णवाहिकेने सुरुवातीला रनाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये सुनिल अंबरसिंग ठाकरे (वय १०), अरुण अशोक ठाकरे (३०), अरुणी प्रविण चौधरी (२१), रविंद्र वसंत सोनवणे (३५), पुनाबाई नाना शेंडाळे (१६), अनुसया पिंटू शिंदे (१०), हिराबाई शिवा सोनवणे (३५), पिंटू कावबवाजी सोनवणे (१८), गोरख पोपट चौधरी (२७), धनराज संजू शेंडाळे (६), अशोक बहिरम चौधरी (१४), अर्जुन प्रविण चौधरी (१८), जुमन रमण सोनवणे (२७), दीपक नंदू चौधरी (१८), जित्या आभ्या ठाकरे (२२), संजय चंदू मालचे (१५), श्रावण संग्राम ठाकरे (९), शंकर शामा शेंडाळे (३५), आशाबाई रावसाहेब सोनवणे (३५), राहूल रावसाहेब सोनवणे (१०, सर्व रा.ब्राह्मणवेल ता.साक्री जि.धुळे), धनाबाई पिंटू ठाकरे (२२), पिंटू चिंतामण ठाकरे (२५), नंदा पिंटू ठाकरे (७, तिघे रा.आमखेल) तसेच जितू तुकाराम चौरे (३५, रा.बंधारपाडा) यांचा समावेश आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना स्वप्नील ग्यानदेव भील (वय १६, रा.दहिवेल ह.मु.ब्राह्मणवेल) व अन्य एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहन चालक अरविंद ठाकरे याच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या