नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा येथील बारावीत शिकत असलेल्या मुलीचा गेल्या दोन वर्षांपासून पाठलाग करुन विनयभंग करण्यात येत होता. तसेच तिच्या छायाचित्रांशी छेडछाड करून ते छायाचित्र तिच्या होणार्या पतीला पाठवून लग्न मोडण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलीसांनी अटकही केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील पिडीता ही कै.सी.जी.एफ.पाटील ज्युनिअर कॉलेज येथे शिकत आहे. शहादा येथील मेमन कॉलनीत राहणार्या अहमद सलीम इसाई याने पिडीता ही ११ व १२ वीमध्ये शिकत असतांना वेळोवेळी तिचा पाठलाग करून तु मला आवडते, तुझ्यावर माझे प्रेम असून तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून फिर्यादी मुलीचा विनयभंग केला.
पिडीत मुलीने या गोष्टीचा विरोध केल्याने अहमद इशानी याने तु माझ्याशी लग्न केले नाही तर संपूर्ण कुटूंबाला मारून टाकेल अशी धमकी देत होता. पाठलाग करून पिडीता मुलीच्या पाठीमागून फोटो घेत असे. त्या मुलीचे सुरत येथील युवकाशी लग्न जुळवून साखरपुडा झाल्यानंतर अहमद इशानी याने मुलीच्या वडीलांना मोबाईलवरून लग्न मोडण्यास सांगितले व लग्न मोडले नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली.
संशयीत आरोपी अहमद इशानी याने पिडीता मुलीच्या भावी पतीच्या इस्टाग्राम आयडीवर इस्टाग्राम फेक आयडी बनवून त्यावरून अश्लील व धमकवणारे मॅसेज तसेच पिडीत मुलीचे चार पाच फोटो व व्हीडीओ क्लीप पाठविली.
पिडीत मुलगी ही कॉलेज शिकत असतांना सांस्कृतीक कार्यक्रमातील मैत्रिणीसोबत काढलेला गृपफोटोमध्ये छेडखानी करून तिचा भावी पतीला व सासरकडील लोकांना फेसबुक व इस्टाग्राम पाठवून जुळलेले लग्न संबंध मोडण्यास प्रवृत्त केले. म्हणून पिडीत युवतीचा फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अहमद सलीम ईशानी याच्याविरूध्द भादंवि कलम ३५४, ३५४ (ड) ४६५, ४६९, ४७१, ५०७, माहिती तंत्रज्ञान कायदा २०००चे कलम ६७ (अ) ६६ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला चौकशीसाठी पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नजनपाटील करीत आहेत.