Sunday, March 30, 2025
Homeनंदुरबारदीड हजाराची लाच घेतांना तलाठयास अटक

दीड हजाराची लाच घेतांना तलाठयास अटक

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

सातबारा उतार्‍यावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या देवमोगरा सजा खांडबारा ता.नवापूर येथील तलाठी जयसिंग गुंजार्‍या पावरा याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. दरम्यान, याच तलाठयाला सन 2018 मध्ये लाच घेतांना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर येथील तक्रारदार यांच्या वडिलांची डोगेगाव शिवार ता.नवापूर येथे गट क्रमांक 101/2 ही शेतजमीन आहे.

सदर जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर त्यांच्या वडिलांचे लागलेल्या नावात दुरुस्ती होण्यासाठी तलाठी जयसिंग पावरा याने तक्राराकडे दि.20 जानेवारी 2021 रोजी दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंच व साक्षीदार यांच्यासमक्ष केली व ती लाच आज दि.27 जानेवारी 2021 रोजी खांडबारा येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तलाठयास नंदुरबार युनिटने दि. 12 मार्च 2018 रोजी लाच घेताना नंदुरबार तलाठी कार्यालयात पकडले होते. कर्तव्यावर हजर झाल्यानंतर त्याने त्याचे लाच घेण्याचे उद्योग पुन्हा सुरू केले. लाच लुचपत विभाग नंदुरबार यांना याबाबत तक्रार प्राप्त होताच त्यास पुन्हा लाच घेताना पकडण्यात आले आहे

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव, हे.कॉ. महाजन, हेकॉ. गुमाणे, पोकॉ दीपक चित्ते, मनोजअहिरे, संदीप नावडेकर, अमोल मराठे, ज्योती पाटील, चालक हेकॉ मनोहर बोरसे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचार्‍यांनी किवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक शिरीष जाधव यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Modi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा महान अक्षय वटवृक्ष; पंतप्रधान...

0
नागपूर । Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या...