Saturday, March 29, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार : अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून वस्तुंचा पुरवठा ; शासनाच्या १३ कोटी ६०...

नंदुरबार : अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून वस्तुंचा पुरवठा ; शासनाच्या १३ कोटी ६० लाखांचा अपहार ; व्यापार्‍यांवर गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी-

अस्तित्वात नसलेल्या कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करुन त्या आधारे जीएसटी नंबर मिळवून वस्तुचा प्रत्यक्ष पुरवठा व खरेदी न करता खोटी देयके सादर करुन १३ कोटी ६० लाख ८७ हजार ६८९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धुळे येथील एका व्यक्तीसह त्याच्या व्यापारी साथीदारांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथील मोहम्मद आसिफ मोहम्मद यासीन अन्सारी व त्याच्या इतर व्यापारी साथीदारांनी संगनमत करुन बनावट कागदपत्र तयार करुन मे.तुमिसा टक्स ही कंपनी स्थापन केली. त्या आधारे जीएसटी क्रमांक मिळविला. सदर कंपनी अस्तित्वात नसतांना वस्तंचा प्रत्यक्ष पुरवठा व खरेदी न करता खोटी बिजके सादर करुन शासकीय महसूलाचा १३ कोटी ६० लाख ८७ हजार ६८९ रुपयांचा अपहार केला.

सदर अपहार दि. १ जुलै २०१७ ते १० डिसेंबर २०१९ या कालावधीत नवापूर क्षेत्रात घडला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत अपहाराचा प्रकार निष्पन्न झाल्याने वस्तु व सेवाकर कार्यालयाचे राज्य कर अधिकारी वसंत गावजी वसावे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद आसिफ मोहम्मद यासिन अन्सारी (रा.सर्व्हे क्रमांक ४०३, प्लॉट क्रमांक २७, वडजाई रोड कबीर गंज धुळे) व त्याचे इतर व्यापारी साथीदार यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र वस्तु व सेवा कायदा २०१७ चे कलम १३२ (१) (क) (ख) (ग) (ड) (च) (ठ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बोगस शालार्थ आयडीतून वेतन; शिक्षण उपसंचालकांकडून लेखाधिकारी व...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) दहा शिक्षण संस्थांत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची (Employees) बोगस भरती करून या शिक्षकांना (Teachers) बनावट कागदपत्रांच्या...