Saturday, May 25, 2024
Homeनंदुरबारपेट्रोलपंपातून दीड लाखाचे डिझेल लंपास

पेट्रोलपंपातून दीड लाखाचे डिझेल लंपास

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार शिवारातील निलेश पेट्रोलपंपावरून 1 लाख 38 हजार 524 रूपयांचे डिझेल चोरल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शिवारातील निलेश पेट्रोल पंपामधून दि.19 ते दि.20 मे 2020 दरम्यान अज्ञाताने 1 लाख 38 हजार 524 रूपयांचे 2176 लिटर डिझेल लंपास केले.

याप्रकरणी मॅनेजर अमर रविंद्र काशिद रा.कल्याणी पार्क, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश पवार करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या