Monday, May 27, 2024
Homeधुळेनंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर भीषण अपघात ; एक ठार, तीन जखमी

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर भीषण अपघात ; एक ठार, तीन जखमी

दोंडाईचा (श. प्र.) dhule

नंदुरबार (nandurbar) रस्त्यावर शिंदखेडा (shindkheda) तालुक्यातील धावडे गावापासून दोन किमी अंतरावर पोल्ट्री फार्म जवळ दुचाकी व मालवाहू पीकअपची समोरासमोर धडक (accident) झाली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने मृत व्यक्ती व जखमी अर्धा तास रस्त्यावर पडून होते.

- Advertisement -

शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावाजवळ दोन किलोमीटर अंतरावर पोल्ट्री फार्मच्या समोर नंदुरबार कडून येणारी मालवाहू पिकअप ( क्र. एम एच १५, जी व्ही ४३३६) ही पुढे चालत असलेल्या ४०७ मालवाहू गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअपने समोरून येणाऱ्या ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकलला जोरदार धडक दिली, असून त्यात मोटर सायकल स्वार देवनाथ अमृत सपकाळे (वय ४५) जागीच ठार झाला व मोटारसायकल स्वार पत्नी वंदना देवनाथ सपकाळे, मोठी मुलगी परशनी दिगंबर अहिरे, लहान मुलगी गीता देवनाथ सपकाळे गंभीर जखमी झाले असून या तिघे माय लेकिंना पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, प्रकाश पावरा, निलेश धनगर, नरेंद्र शिरसाठ उपस्थीत होते.

देवनाथ सपकाळे हा मातंग समाजाचा असून तो गावातील मौतीच्या ठिकाणी डफ वाजण्याचे काम करत होता. वृद्ध आई वडील समोर घटना पाहून हंबरडा फोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या