Saturday, April 5, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार पोलीसांनी आणखी तीन बालविवाह रोखले

नंदुरबार पोलीसांनी आणखी तीन बालविवाह रोखले

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

अक्कलकुवा पोलीसांनी (Akkalkuwa Police) दोन तर विसरवाडी पोलीसांनी एक असे तीन बालविवाह (child marriage) रोखले (Prevent) आहेत. गेल्या आठवडयात पाच बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.4 मे 2023 रोजी विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना स्थानिक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळाली की, विसरवाडी गावात दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबिय नियोजन करीत असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना कळविल्याने त्यांनी सदरचे बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले.

कुसुंब्याचे शेतकरी कुणाल शिंदे यांच्या अनोख्या प्रयोगाची होतेय चर्चा..अल्पवयीन युवतीवर अत्याचार

त्याप्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्यांनी तात्काळ माहिती काढली असता, विसरवाडी गावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह साक्री व एका अल्पवयीन मुलीचा विवाह नंदुरबार येथील तरुणांसोबत निश्चित करण्यात आला होता, परंतू विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घरी जावून अल्पवयीन मुलींच्या कुटुंबीयांचे व त्यांच्या समाजाचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच दोन्ही अल्पवयीन मुलीच्या पालकांना विसरवाडी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

तसेच दि.4 मे 2023 रोजी अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील बेटी या गावात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी जावून माहिती घेतली असता बेटी गावातील अल्पवयीन मुलीचा होराफळी गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करण्यात आला होता. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच हजर असलेले गावकरी यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार्‍या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी तीन दिवसात पाचवा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल, अस विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील, बेटी गावाचे पोलीस पाटील सुरेश वसावे, होराफळीचे पेालीस पाटील दारासिंग वळवी यांनी केली.

वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक...