Wednesday, May 22, 2024
Homeनंदुरबारतळोदा तालुक्यातील मद्य कारखाना उद्ध्वस्त

तळोदा तालुक्यातील मद्य कारखाना उद्ध्वस्त

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील दलेलपूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेतात बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे आज सायंकाळी छापा टाकून उद्ध्वस्त केला.

 
याबाबत एका संशयतीला ताब्यात घेण्यात आले आहे. या धाडीत 81 हजार 30 रुपयांचा माल पकडण्यात आला. असून त्यात  बॉम्बे स्पेसल व्हिस्की च्या व119 बाटल्या, व  यंत्र सामग्री सह व इतर साहित्य सह हस्तगत करण्यात आले आहे .
 
पुढील तपास स्थानिक गन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करत आहेत. याबाबत पोलीस स्टेशन ला रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती.  सदर कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्याक फौजदार अनिल गोसावी, हे को. योगेश सोनवणे, पो ना. विकास अजगे, पो को.जितेंद्र ठाकूर, आंनदा मराठे, अभय राजपूत, या पथकाने सदर कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या