Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : एकाच दिवशी रोखले दोन बालविवाह

नंदुरबार : एकाच दिवशी रोखले दोन बालविवाह

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात नंदुरबार पोलीसांना यश आले आहे. आतापर्यंत जिल्हयात 24 बालविवाह रोखण्यात आले आहेत. दि.7 जून 2023 रोजी ऑपरेशन अक्षता या उपक्रमासाठी सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर एका सुज्ञ नागरिकाने फोनकरुन माहिती दिली की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा गावात दि.7 जून 2023 रोजी एका अल्पवयीन मुलीचा अस्तंबा येथील तरुणाशी साखरपुडा होणार असून विवाहाची तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी धडगांव पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून होवू घातलेला बालविवाह रोखला.

- Advertisement -

सिसा येथील साखरपुडा कार्यक्रमात धडगांव पोलीस ठाण्याचे पथक पालकांचे समुपदेशन करीत असतांनाच पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना धडगांव पोलीस ठाणे हद्दीतीलच कुंडल येथे देखील एका अल्पवयीन मुलीचा खामला ता. धडगांव येथील तरुणासोबत आज दि.7 जून रोजी बालविवाह होणार असून कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी पथकासह तात्काळ कुंडल येथे जावून अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.

अशाप्रकारे एकाच दिवसात सिसा व कुंडल येथील दोन बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश मिळाले. पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत 24 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, उपनिरीक्षक प्रवीण महाले, पोलीस हवालदार स्वप्नील गोसावी, पुष्पेंद्र कोळी, पोलीस अंमलदार विश्वजीत चव्हाण सिसा गावाचे पोलीस पाटील श्री. पंडित पाडवी व कुंडल गावाचे पोलीस पाटील हरीष पाडवी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या