Monday, November 25, 2024
Homeक्रीडानाओमी ओसाका ठरली US Open 2020 ची विजेता

नाओमी ओसाका ठरली US Open 2020 ची विजेता

जपानची नाओमी ओसाका(Naomi Osaka)ने US Open 2020 एकेरी स्पर्धेची विजेता ठरली आहे. तिच्या करिअरमधील हे तिसरे विजेतेपद आहे. तीन ग्रॅड स्लॅम(3rd Grand Slam) जिंकणारी ही पहिली आशियाई महिला ठरली आहे.

नाओमी ओसाकाने दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदाचा मान पटकावला आहे. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये ओसाकानं बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला(Victoria Azarenka) हरवले आहे.

- Advertisement -

पहिल्या सेटमध्ये मोठ्या फरकाने हरल्यानंतर देखील ओसाकानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत सगल दोन सेट जिंकले. आर्थर अॅश स्टेडियमवर विजेतेपदासाठीच्या लढतीत ओसाकानं अजारेंकाला 1-6, 6-3, 6-3 अशा फरकाने हरवले.

या आधी नाओमी ओसाकाने 2018 मध्ये अमेरिकन ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये पदक कमावलं होत. या आधी 2012 आणि 2013 च्या यूएस ओपनमध्ये तिनं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण दोन्ही वेळा तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या