Thursday, May 1, 2025
HomeनाशिकVideo : नार-पार नदीचा नेकलेस पॉईंट पाहिलात का?

Video : नार-पार नदीचा नेकलेस पॉईंट पाहिलात का?

नाशिक । Nashik

नाशिक जिल्ह्याला (Nashik District) अनेक पर्यटन स्थळांची (Tourisam) देणं लाभलेली आहे. यात अनेक पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत तर अनेक पर्यटन स्थळे विकासापासून आणि प्रसिद्धीपासून वंचित आहेत. यापैकीच एक म्हणजे पेठ- सुरगाणा तालुका (Peth Taluka) सीमेवरील नार पार नदीचे (Nar Par river) विहंगम दृश्य.

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) महत्वाची असलेल्या नार पार नदी हा परिसर विलोभनीय दिसतो. म्हणजेच शेपूझरी गावाजवळ (Shepuzari Village) असलेल्या नदीला नेकलेस पॉईंट (Neckles Point) म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात तर याच रूप पर्यटकांना (Tourist) आकर्षित करेल असेच असते. जवळच असलेल्या केम डोंगरातून नार-पार, गिरणा, कादवा, वाझडी, औरंगा, अंबिका या सप्त नद्यांचा उगम होतो. या सातही नद्यांचे प्रवाह वेगवेगळ्या दिशेने वाहत जातात.

पैकी नार-पार या हि नदी डोंगर द-या खो-यातून मार्गक्रमण करीत अरबी समुद्रात जाऊन मिळते. सध्या पावसाचे वातावरण असल्याने खुलला आहे. त्यामुळे नदीलाही पूर आला आहे. शेपुझरी जवळील हा पॉईंट एखाद्या नेकलेस असल्याचा भास होतो. त्यामुळे येथील स्थनिकांनीच त्याला नेकलेस पॉईंट नाव दिले आहे.

पाऊस झाल्याने हा परिसर नैसर्गिक सौंदर्याने खुलला असून नदीच्या काठावर वसलेले खेडी मनमोहक दिसतात. याच प्रकारे खोकरविहिर ते शेपूझरी कडे जातांना हे निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळते.. सर्व परिसर हा नयनरम्य निसर्ग आपल्या डोळ्यासमोर दिसत असतो आणि बघता बघता तो आपल्या मोबाईल मध्ये कैद करावासा वाटतो.

सध्या खोकरविहीर, शेपूझरी, भेनशेत, खिर्डी, भाटी, सागपाडा, माजघर, भिवतास हि गावे नदीजवळ येतात. येथील गावाचेही निसर्ग सौंदर्य बघणायसारखं आहे. परंतु अद्यापही हा परिसर प्रसिद्धीपासून खूप दूर आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाकाजात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राज्यातील सरकारी कार्यालयांना (Government Offices) शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन तसेच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने...