दोंडाईचा Dondaicha। प्रतिनिधी
संपूर्ण खान्देशातील चर्चेत असलेल्या दोंडाईचा बाजार समितीच्या (Dondaicha Market Committee) निवडणुकीत एकिकडे आ.जयकुमार रावल आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते, पंरतू तालुक्यातील मतदारांनी आ.जयकुमार रावल यांच्या पॅनलला 70 टक्के तर विरोधी 6 नेत्यांच्या संयुक्त पॅनलला केवळ 30 टक्के देवून सर्वच्या सर्व 18 जागांवर आ.रावल यांच्या पॅनलचा दणक्यात विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापती पदासाठी सकाळी विशेष सभा घेण्यात आली. तीत सभापती पदासाठी (Chairman) पुन्हा एकदा नारायण बाजीराव पाटील (Narayan Patil)यांची तर उपसभापतीपदावर पिंपरखेडा येथील प्रा.रमेश खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर शिंदखेडा तालुक्यात माजीमंत्री आ.जयकुमार रावल यांचे वर्चस्व कायम राहीले आहे.
सकाळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. तीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी निवडणुक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक जिजाबराव पाटील, मोतीलाल वाकडे, दगेसिंग गिरासे, पी.एल.पवार, संजय ठाकरे, वैशाली शामकांत पाटील, स्नेहल हर्षवर्धन बागल, जयसिंग गिरासे, किशोर रंगराव पाटील, साहेबराव पेंढारकर, डॉ.दिपक बोरसे, आत्माराम बोरसे, दादाभाई सोनवणे, एकनाथ नाईक, रोशन टाटीया, राहुल कवाड आदी संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर आ. जयकुमार रावल यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा सत्कार केला. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशा आणि डी.जे.च्या तालावर आनंदोत्सव साजरा केला. बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जल्लोष साजरा केल्यानंतर बाजार समिती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून मिरवणुक रावल गढीपर्यत काढण्यात आली. याठिकाणी आ.जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जि.प.चे माजी गटनेते कामराज निकम, शिक्षण सभापती महाविरसिंह रावल, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र देसले, जि.प.सदस्य पंकज कदम, डी.आर.पाटील, धनजंय मंगळे, विरेंद्रसिंग गिरासे, निखील जाधव, रवि उपाध्ये, नबु पिंजारी, नरेंद्र गिरासे, राजू धनगर, चिरंजीवी चौधरी, रणजित गिरासे, भारत ईशी, कुलदिप गिरासे, जितेंद्र गिरासे, डॉ.नितीन चौधरी अनिल सिसोदिया, पं.स.सदस्य दिपक मोरे, रामनाथ मालचे, भरतरी ठाकूर, कृष्णा नगराळे, संदीप धनगर, पंकज चौधरी, मनोज निकम, भिकन बागवान, महेंद्र कोळी , पप्पु धनगर, साहेबराव पवार, यांच्यासह शेकडो भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.