शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
कोणाचे नाव घेतायत, विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेचे (Uddhav Thackeray) काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची घणाघात टीका (Criticism) खा. नारायण राणे यांनी शिर्डीत केली. पुढच्या निवडणूकी पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्षा राहणार नाही असा खळबळजनक दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला.
खा. नारायण राणे (MP Narayan Rane) यांनी रविवार दि.6 रोजी श्रीरामनवमी निमित्ताने सपत्नीक शिर्डीत (Shirdi) येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साई संस्थनाच्या वतीने खा. राणे यांचा उपमुख्य कार्यकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साई दर्शनानंतर खा. राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचा चांगलाच समाचार घेतला. विधायक सामाजिक विकास कामांची विचारसरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नाही. 39 वर्ष मी उद्धव ठाकरे बरोबर कायम केले. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्षा होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत बाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत सकाळी उठल्यावर घरा बाहेर मीडियाला बोलून दुकाना चालवतो.
संजय राऊतने आपले कर्तव्य सांगावे देशासाठी राज्यासाठी आणि स्वतःचा गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतचा कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊताला मूर्ख माणूस समजत असल्याचही राणे यावेळी म्हणाले आहे. संजय राऊतचे प्रत्येक वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी शेतकर्यांबद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना कोकाटे यांनी शेतकर्यांबदल व्यक्त केलले मत चुकीचे आहे असेही खा.राणे म्हणाले.