Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNarayan Rane: "आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर"…; नारायण राणेंचे ट्विट काय?

Narayan Rane: “आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर”…; नारायण राणेंचे ट्विट काय?

मुंबई | Mumbai
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना लक्ष्य केले जाऊ लागल्यानंतर आता भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी ट्विट करत वाघ यांची पाठराखण केली आहे.

- Advertisement -

काय आहे नारायण राणेंचे ट्विट
वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या १५ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई!, असे नारायण राणे म्हणाले.

मी सत्यासाठी आणि न्यायासाठी लढत राहीन
नारायण राणे यांच्या ट्वीटवर चित्रा वाघ यांनीही कमेंट केली आहे. धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना जरुरी है. जो जिन्दा हों तो फिर जिन्दा नजर आना जरूरी है. मी सत्यासाठी… न्यायासाठी… अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते… पुनःश्च धन्यवाद नारायण राणे साहेब, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी काल सभागृहात जोरदार भाषण केले. “दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे. त्याच्यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. मी जे करायचे होते ते केले. मला जे दिसले जे पुरावे आले, त्यावर मी लढले. तुम्ही तोंड शिवून बसला होता. मला विचारता ते कसे मंत्रिमंडळात आले, असे मला विचारता”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...