मुंबई | Mumbai –
महाविकास आघाडीत एकमत नाही, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत त्यामुळे सरकार चालताना दिसत नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हे सरकार राहील असा पुनरुच्चार भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. Narayan Rane
- Advertisement -
यापूर्वीही नारायण राणे यांनी 15 दिवसांत राज्य सरकार पडेल, असा दावा केला होता. ते म्हणाले, सध्या सरकार चालत नाही, प्रत्येक पक्षात वाद आहेत, महाविकास आघाडीत एकमत नाही. त्यामुळे सरकार चालणार कसं? जेमतेम हे सरकार सप्टेंबरपर्यंत चालू शकेल असा दावा त्यांनी केला आहे.