Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमअंमली पदार्थ विकणार्‍या महिलेला अटक

अंमली पदार्थ विकणार्‍या महिलेला अटक

शिरूर |तालुका प्रतिनिधी| Shirur

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात मेफेड्रोन हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याकडून मेफेड्रोन पावडर व एक मोबाईल असा एकूण 3 लाख 17 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर परिसरात काही दिवसांपूर्वीच दोन नशेली पानांच्या दुकानांवर कारवाई केल्यानंतर आता मेफेड्रोन अंमली पदार्थ विकणार्‍या महिलेला अटक केल्यामुळे शिक्रापूर परिसर नशेली पदार्थांचा हब झालाय का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. जबीन जावेद शेख (वय 38 वर्षे, रा.गल्ली नंबर 2, पिंपळे गुरव, पुणे) या महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर तीनही पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात ड्रग सदृश पदार्थांची विक्री होत असल्याची शिरूर तालुक्यात चर्चा होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शिरूर तालुक्यात अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपास करत असताना 4 मार्चला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिक्रापूर पोलीस स्टेशन पथक शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पुणे शाखेचे पोलीस हवालदार तुषार पंदारे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कोरेगाव भिमा डिंग्रजवाडी फाटा येथे एक महिला तिच्याजवळील पर्समधून एक लहान पिशवी काढून प्रवाशांना दाखवित आहे, या माहितीच्या आधारे पोलीस पथकातील महिला पोलीस अंमलदार पूजा सावंत यांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता महिलेने तिचे नाव जबीन जावेद शेख (रा.पिंपळे गुरव, पुणे) असे सांगितले.

सदर महिलेच्या पर्स ची तपासणी केली असता पर्समधून प्लास्टिकची पारदर्शक पिशवी व त्यामध्ये हाफव्हाईट रंगाची 15.85 ग्रॅम वजनाची पावडर (मेफेड्रोन अंमली पदार्थ ) व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 3 लाख 17 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, शिक्रापुर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार नवनाथ नाईकडे, रोहीत पारखे, शिवा चितारे, महिला अंमलदार पुजा सावंत यांनी केली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...