Saturday, May 4, 2024
Homeनगरज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी नरेंद्र घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी पांडुरंग...

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी नरेंद्र घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी पांडुरंग अभंग यांची निवड

भेंडा l वार्ताहर l Bhenda

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली दि.21 जानेवारी रोजी बिनविरोध झाली होती.

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा मंगळवार दि.2 फेब्रुवारी रोजी 11 वाजता कारखाना अतिथीगृहात संपन्न झाली. अध्यक्ष पदासाठी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील व माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांचे एक एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.

यावेळी मावळते अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,जेष्ठ संचालक अड देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या